ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे यांची संपूर्ण माहिती
बालपणाविषयी थोडक्यात माहिती:
बालपण परंडा शहरामध्ये गेलं परंडा शहरातील सरस्वती विद्यालयात प्राथमिक शिक्षण पूर्ण पाच-सहा वर्षाचा असल्यापासून वडील परंडा शहराजवळील छोट्या छोट्या खेड्यांमध्ये भजन व कीर्तनासाठी घेऊन जात असत तेव्हापासून भजन किर्तनाची आवड मनामध्ये निर्माण झाली.
कार्याविषयी / संस्थेविषयी थोडक्यात माहिती:
कीर्तनातून तरुणांमध्ये व्यसनाधीनता कमी करणे समाज प्रबोधन करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर व्याख्यान करणे परंडा शहरापासून जवळ असलेल्या कात्राबाद गावामध्ये दोन हजार वृक्ष सवंर्धनासाठी काम करत आहे अनेक तरुण एकत्र करून त्यांना गड कोट किल्ले पाहायला घेऊन जाण्यासाठी काम करतो
कुटुंबाविषयी थोडक्यात माहिती
घरामध्ये आई-वडील, एक भाऊ, पत्नी असा परिवार आहे
इतर माहिती
कीर्तनाचे शिक्षण सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथे झाले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालय येथून राज्यशास्त्र विषयातून पदवी तर मराठवाडा मित्र मंडळ पुणे या महाविद्यालयातून पत्रकारिता मास्टर डिग्री पूर्ण केली आहे. अध्यात्मिक शिक्षण ह भ प गुरुवर्य रामभाऊ महाराज राऊत गाथा मूर्ती ह भ प गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर संत रघुराज महाराज संस्थान श्रीक्षेत्र बिटरगाव यांच्याकडे संपन्न.आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर 3000 कीर्तन सेवा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज महाराज या विषयावर 250 अधिक व्याख्यान महाराष्ट्रात संपन्न.झी टॉकीज या वाहिनीवर कीर्तन सेवा संपन्न.शेमारु मराठी बाणा या वाहिनीवर कीर्तन सेवा संपन्न.प्रवाह पिक्चर द्या वाहिनीवर कीर्तन सेवा संपन्नजय महाराष्ट्र, महाराष्ट्र वन ,am news,या वाहिनीच्या माध्यमातून वारी निरूपण या विषयावर पंधरा दिवस वारी निरूपण संपन्न.
संपूर्ण नाव | बालाजी महाराज बोराडे |
मुळगाव | स्वामी समर्थ नगर परंडा, महाराष्ट्र |
संपर्क क्रमांक | 8830098441 |
कीर्तन Video 👇
संपूर्ण माहिती वाचल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार🙏